शिवसेनेला सुनावण्यासाठी नितीन गडकरींवर दबाव असावा: भास्कर जाधव

शिवसेनेला सुनावण्यासाठी नितीन गडकरींवर दबाव असावा: भास्कर जाधव

| Updated on: Aug 17, 2021 | 2:30 PM

कोरोना काळात राज्यातील भाजप नेते पदाधिकाऱ्यांना सुनावलं होतं, त्यामुळे भाजपमधील नाराजी दूर करण्यासाठी गडकरींनी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असावं, असं आमदार जाधव यांनी म्हटलं आहे.तसेच शिवसेनेला सुनावण्यासाठी गडकरींवर कोणाचा तरी दबाव असावा, असा दावा देखील भास्कर जधव यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून सध्या राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी गडकरी यांना टोला लगावत काही सवाल उपस्थित केले आहेत. चिपळूणमध्ये बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, ज्या रस्त्याच्या कामावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे, त्या रस्त्याचं काम हे 10 टक्के रखडलेलं आहे. जर 10 टक्के रखडलेल्या कामाला गडकरी शिवसेनेला जबाबदार धरत असतील, तर 90 टक्के पूर्ण झालेल्या कामाचं श्रेय देखील शिवसेनेला मिळालं पाहिजे असं म्हणत आमदार भास्कर जाधव यांनी नितीन गडकरी यांना टोला लगावला आहे. तसेच नितीन गडकरी यांनी कोरोना काळात राज्यातील भाजप नेते पदाधिकाऱ्यांना सुनावलं होतं, त्यामुळे भाजपमधील नाराजी दूर करण्यासाठी गडकरींनी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असावं, असं आमदार जाधव यांनी म्हटलं आहे.तसेच शिवसेनेला सुनावण्यासाठी गडकरींवर कोणाचा तरी दबाव असावा, असा दावा देखील भास्कर जधव यांनी केला आहे.