Bhaskar Jadhav | मी तालिका अध्यक्ष म्हणून बसल्यावर विरोधी पक्षाचा गोंधळ कमी झाला – भास्कर जाधव

| Updated on: Dec 23, 2021 | 8:20 PM

विरोधी पक्षाच्या आक्रमकतेला 12 आमदार निलंबित झाल्यापासून लगाम लागला, वचक बसला. म्हणून विरोधक आता सावध भूमिकेत आहेत हे मात्र नक्की खरं, असे भास्कर जाधव म्हणाले.

मुंबई : मी तालिका अध्यक्ष म्हणून बसल्यावर विरोधी पक्षाचा गोंधळ कमी झाला ही चांगली गोष्ट आहे. मी तालिकेवर गेलो तेव्हा गोंधळ सुरू होता, विरोधी वेलमध्ये आले आणि गोंधळ सुरू होता. पण मी जेव्हा जाऊन बसलो तेव्हा ते सर्व मागे हटले माझा आणि अध्यक्षपदाचा आणि कामकाजाचा मान राखणं म्हणता येईल. विरोधी पक्षाच्या आक्रमकतेला 12 आमदार निलंबित झाल्यापासून लगाम लागला, वचक बसला. म्हणून विरोधक आता सावध भूमिकेत आहेत हे मात्र नक्की खरं, असे भास्कर जाधव म्हणाले.