सत्ताधारी नेते हमरीतुमरीवर… शिंदे गटाच्या आमदाराची छगन भुजबळांना शिवीगाळ, ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल
शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल... कार्यकर्ता दुर्गेश बागुल आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील संवाद व्हायरल होतोय. दरम्यान, कार्यकर्ता दुर्गेश बागुल आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील संवादाच्या ऑडिओ क्लिपची टिव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.
मुंबई, १ फेब्रुवारी २०२४ : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. आमदार संजय गायकवाड या ऑडिओ क्लिपमध्ये शिवीगाळ करत आहे आणि शिवीगाळ करतानाचीच ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. आमदार संजय गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यासोबत फोनवर संवाद साधत होते. या संवादादरम्यान, संजय गायकवाड यांनी अर्वाच्य शब्द वापरल्याचे सांगितले जात आहे. कल्याणचे कार्यकर्ते दुर्गेश बागुल यांच्या सोबत संजय गायकवाड हे बोलत असताना त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केली आहे. कार्यकर्ता दुर्गेश बागुल आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील संवाद व्हायरल होतोय. दरम्यान, कार्यकर्ता दुर्गेश बागुल आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील संवादाच्या ऑडिओ क्लिपची टिव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.
Published on: Feb 01, 2024 03:48 PM
Latest Videos