‘राऊतच्या डोक्यावर परिणाम, तो पागल माणूस’; ‘त्या’ आरोपांवर एकेरी उल्लेख करत शिरसाटांचा पलटवार
संजय राऊत यांनी केलेला आरोप हा मूर्खपणाचा आहे. पराभव यांना माहित होता, काँग्रेसला फोडण्याचं काम जर कोणी केलं तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने केलं त्यांच्या अस्तित्व यांनी धोक्यात आणलं असल्याचे संजय शिरसाट म्हणला. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले?
विधान परिषदेच्या निवडणुकीत एक-एक मत फोडण्यासाठी २५ कोटी रूपये आमदारांना दिले. तर इतकंच नाहीतर २ एकर जमीनदेखील भाजपने दिली, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय. ‘संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्याचं वक्तव्य महत्त्व देण्यासारखं नसतं. तो पागल माणूस आहे.’, असं संजय शिरसाट एकेरी उल्लेख करत म्हणाले. तर विधान परिषदेच्या एक सदस्य त्याच्यासाठी २५-२५ कोटी रुपये कोण देणार ?? असं कोण करतं? असा सवाल संजय शिरसाट यांनी केलाय. तर संजय राऊत यांनी केलेला आरोप हा मूर्खपणाचा आहे. पराभव यांना माहित होता, काँग्रेसला फोडण्याचं काम जर कोणी केलं तर ते उबाठा पक्षाने केलं त्यांच्या अस्तित्व यांनी धोक्यात आणलं असल्याचे संजय शिरसाट म्हणला.
Published on: Jul 13, 2024 04:34 PM
Latest Videos