संभाजीनगरमधील मविआच्या सभेवरून शिवसेना नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, 'ही सभा म्हणजे…'

संभाजीनगरमधील मविआच्या सभेवरून शिवसेना नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, ‘ही सभा म्हणजे…’

| Updated on: Mar 31, 2023 | 12:46 PM

VIDEO | छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या २ एप्रिलरोजी महाविकास अघाडीची सभा होणार, शिवसेना नेत्याचा खोचक टीका

मुंबई : येत्या २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा घेतल्या जाणार असून ही पहिली सभा असणार आहे. या सभेला मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. अशातच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या सभेवरून खोचक टीका केली आहे. ‘महाविकास आघाडीने सभा घ्यावी, दरम्यान, त्यांना सभा घेण्यासाठी बंदी घालण्यात आली तर लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा ते आरोप करतील. त्यांना दोन्ही बाजूने राजकारण करायचं आहे. त्यांच्या सभेत ते दोन-चार टोमणे आणि डायलॉग, एकमेकांना डोळे मारतील. या सभेत शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हितांच काहीही बोलणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीची सभा म्हणजे केवळ कॉमेडी शो आहे’, असल्याचे शिवसेनेते आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 31, 2023 12:01 PM