येत्या सोमवारी मोठा भूकंप होणार... संजय शिरसाट यांचा दावा काय?

येत्या सोमवारी मोठा भूकंप होणार… संजय शिरसाट यांचा दावा काय?

| Updated on: Mar 16, 2024 | 6:12 PM

येत्या सोमवारी मोठा धक्का बसणार असल्याचा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. इतकंच नाहीतर छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार हा शिवसेनेचा असणार असेही त्यांनी म्हटले आहे. हा उमेदवार महायुतीचा नसून शिवसेनेचा असणार आहे.

मुंबई, १६ मार्च २०२४ : गेल्या दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे तीन मंत्री केंद्रात जाणार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केले होते. त्यानंतर संजय शिरसाट यांच्या आणखी एका मोठ्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. येत्या सोमवारी मोठा धक्का बसणार असल्याचा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. इतकंच नाहीतर छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार हा शिवसेनेचा असणार असेही त्यांनी म्हटले आहे. हा उमेदवार महायुतीचा नसून शिवसेनेचा असणार आहे. आमच्याकडे सध्या चार उमेदवार असणार आहे आणि तो कोण असणार हे येत्या सोमवारी कळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटात मोठा असंतोष असून काल आलेले नेते आदेश देतात त्यामुळे नेते पक्ष सोडण्याकडे वळत असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 16, 2024 06:12 PM