चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करावी, शिवसेनेच्या नेत्यानं थेट केली विनंती
VIDEO | चंद्रकात पाटील यांच्या त्या वक्तव्यावर शिवसेनेच्या नेत्यानं इतरांना संधी देऊ नये, असे म्हणत केली ही विनंती
संभाजीनगर : बाबरी पडायला शिवसैनिक नव्हते असा खळबळजनक दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिद पाडण्याच्या मुद्द्यावरून केलेल्या व्यक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलगिरी व्यक्त करण्याची विनंती केली आहे. ते असेही म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी असे वक्तव्य करून गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करू नये. राम मंदिराचे निर्माण हा कोण्या एका पक्षाचा विषय नव्हता. अनेक हिंदू संघटना आणि कार सेवक आयोध्याला गेले होते. राम मंदिर आंदोलनात शिवसेना होती. सहकार मंत्री अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे हे सुद्धा त्यावेळेसही आंदोलनात कार सेवक म्हणून सहभागी होते आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी असे वक्तव्य करून गोंधळ माजवून इतरांना संधी देऊ नये, अशी माझी त्यांना विनंती आहे.