Nashik | शिवसेना आमदार सुहास कांदे यांची छगन भुजबळांविरोधात हायकोर्टात धाव
भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सुहास कांदे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात ऐन बैठकीत खडाजंगी झाली होती.
नाशिकमध्ये महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये पुन्हा वाद उफाळल्याचं दिसत आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी थेट राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी कांदेंनी थेट न्यायालयातच धाव घेतली. याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देखील प्रतिवादी करण्यात आलं आहे. भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सुहास कांदे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात ऐन बैठकीत खडाजंगी झाली होती. त्यानंतर भुजबळांविरोधात कांदेंनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यामुळे नाशकात महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे