Vaibhav Naik | उद्धवजींवर टीका झाली तर आम्ही शांत बसणार नाही : वैभव नाईक
अॅक्शन झाल्यास रिअॅक्शन होणारच. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला. सध्या नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली कोकणात भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेना आणि भाजपमधील राजकीय वातावरण तापले आहे.

दुसरीकडे भाजप पक्षही तितकाच आक्रमक झाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे अज्ञान उघड केले म्हणून एवढा मोठा थयथयाट केलात का? असा सवाल करीत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलाय. तसंच ‘हम किसी को छेडेंगे नहीं, कोई हमको छेड़ेगा तो उसको छोड़ेंगे नहीं’, असा इशाराही शेलार यांनी शिवसेनेला दिलाय.
Published on: Aug 28, 2021 07:37 AM
Latest Videos