ठाण्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ, शिवसेनेचे खासदार राजन विचारे संतापले

ठाण्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ, शिवसेनेचे खासदार राजन विचारे संतापले

| Updated on: Jul 03, 2021 | 4:55 PM

ठाण्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे. शिवसेना आणि इतर पक्षांच्या वतीनं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. ठाण्यात महापालिकेच्या शेजारी राजन विचारे यांनी लसीकरणाचा कँम्प लावला होता.

ठाणे: ठाण्यात शिवसेना खासदार राजन विचारे चांगलेच संतापलेले दिसून आले. ठाण्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे. शिवसेना आणि इतर पक्षांच्या वतीनं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. ठाण्यात महापालिकेच्या शेजारी राजन विचारे यांनी लसीकरणाचा कँम्प लावला होता. लसीकरण केंद्रावर एक शिवसैनिक त्याच्या ओळखीच्या व्यक्तींना लसीकरणासाठी आत सोडत होता. यावेळी हा प्रकार पाहिल्यानंतर राजन विचारे यांनी संताप व्यक्त केला. राजन विचारे यांनी त्या शिवसैनिकाला हटकले. लसीकरण केंद्रांवर गोंधळ झाल्यानं शिवसेना खासदार राजन विचारे संतप्त झालेले पाहायला मिळाले.