Sanjay Raut | येड#%$* आहे तो, महाराष्ट्रात #@* त्यांना स्थान नाही!
भाजप आणि शिवसेनेमधील वाद सध्या विकोपाला गेला असून किरीट सोमय्या (Kirit Somayya) आणि संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमकींनीही कळस गाठला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक आरोप केला.
भाजप आणि शिवसेनेमधील वाद सध्या विकोपाला गेला असून किरीट सोमय्या (Kirit Somayya) आणि संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमकींनीही कळस गाठला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक आरोप केला. या आरोपानंतर संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पत्रकारांसमोर शिवीगाळ केली. हा येड XX आहे… असे शब्द वापरत, मी हे ऑन रेकॉर्ड बोलतोय अशा शब्दात राऊत यांनी ठणकावून सांगितले. संरक्षण खात्याच्या आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या जहाजासाठी किरीट सोमय्या यांनी जवळपास 57 कोटी रुपये गोळा केले, मात्र ते स्वतःच्या घशात घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज केला. लाखो मुंबईकरांच्या राष्ट्रभावनेशी सोमय्या यांनी खेळ केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. यापूर्वीदेखील भर पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा पोत खालच्या पातळीवर घसरल्याची टीका सर्व स्तरांतून केली गेली होती.