सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा, 2 डोस घेतलेल्यांना RTPCR मधून सूट
गणेश चतुर्थीसाठी कोकणात येणा-या चाकरमान्याना यावेळेस दोन डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर चाचणीची गरज नाही, अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
गणेश चतुर्थीसाठी कोकणात येणा-या चाकरमान्याना यावेळेस दोन डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर चाचणीची गरज नाही, अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. लसीचे दोन डोस घेतले असतील तर आरटीपीसीआरची सक्ती करण्यात येणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.यावेळेस राज्यसरकार मुद्दामहून कोणतेही निर्बंध लावणार नाही. मात्र, डेल्टा प्लसचे रूग्ण वाढत आहेत. दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लस होतोय हे दिसून आल्यामुळे काही प्रमाणात काळजी घेतली जातेय.त्यामुळे चाकरमान्यांनी कोकणात येताना शासनाच्या कोरोना नियमांच पालन करून गणेशोत्सव साजरा करावा. राज्य सरकार मात्र जाणून बुजून कोणतीही अडचण नि्रमाण करणार नसल्याची माहीती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
Latest Videos