एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून सामनातून सवाल, बढाया मारणारं शिंदे-फडवणीस सरकार आता गप्प का?

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून सामनातून सवाल, बढाया मारणारं शिंदे-फडवणीस सरकार आता गप्प का?

| Updated on: Feb 17, 2023 | 9:04 AM

VIDEO | सांगलीतील भीमराव सूर्यवंशी यांच्या आत्महत्येचं प्रायश्चित्त शिंदे सरकार कसं घेणार? एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्येवरून सामनातून निशाणा

मुंबई : वेळेत पगार न मिळाल्याने सांगलीतील भीमराव सूर्यवंशी या एसटी चालकानं आत्महत्या केली. या आत्महत्येचं प्रायश्चित्त शिंदे सरकार कसं घेणार? असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आला आहे. मागील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार देऊन त्यांची संक्रांत गोड केली, अशा बढाया मारणारे शिंदे फडवणीस सरकार आता का गप्प आहे, असा सवाल सामनातून करण्यात आला आहे. राज्यात डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे विकास कामांचा धडाका लावलाय, असे ढोल गल्लीपासून दिल्लीपर्यंत बडवले जात आहे. मात्र प्रत्यक्षात राज्याची स्थिती विदारक आहे. हे चित्र समोर आणणारी घटना सांगली जिल्ह्यात घडली. कवठे महांकाळ येथील एसटी कर्मचारी भीमराव सूर्यवंशी यांनी पगार वेळेत न झाल्याने आत्महत्या केली. डबल इंजिन सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यावर जीव देण्याची वेळ का यावी, असा संतप्त सवाल सामनातून करण्यात आला आहे.

Published on: Feb 17, 2023 09:04 AM