संजय राऊत यांच्यासमोर मी लोटांगण कशाला घालू? – संदीपान भुमरे
"ज्यावेळी सत्ता आली, मी मंत्री झालो, त्यावेळी त्यांचे आभार मानण्यासाठी भेट झाली. पण मी लोटांगण कशाला घालू?" असं शिवसेनेचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे म्हणाले.
मुंबई: “ज्यावेळी सत्ता आली, मी मंत्री झालो, त्यावेळी त्यांचे आभार मानण्यासाठी भेट झाली. पण मी लोटांगण कशाला घालू?” असं शिवसेनेचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे म्हणाले. “मी एक कार्यकर्ता आहे. 35 वर्ष शिवसेनेसाठी झटलो. मंत्री झाल्यावर फक्त आभार व्यक्त केले. लोटांगणचा काही संबंध येत नाही, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. संजय राऊत यांनी शांत बसावं, लोक सुद्धा त्यांचं बोलणं ऐकून कंटाळलेत. ते टीव्हीसमोर आले की, लोक टीव्ही बंद करतात” अशी टीका शिवसेनेचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांनी केली.
Published on: Jul 07, 2022 01:08 PM
Latest Videos