'गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही, पण....' सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीसांवर घणाघात

‘गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही, पण….’ सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीसांवर घणाघात

| Updated on: Sep 22, 2022 | 8:17 AM

Saamana Editorial on Gujrat Vedanta Foxconn : सध्या राज्यातील वातावरण उद्योग व्यापारासठी निकोप नाही. राज्यातली मोठी गुंतवणूक खोके कंपनीत झाल्यामुळे वसुलीसाठी उद्योग आणि गुंतवणूकदारांची पळापळ सुरु असल्याचं सामना अग्रलेखात म्हटलंय.

मुंबई : शिवसेनेचं (Shiv Sena News) मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आलीय. वेदांता फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn Row) सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला (Gujrat) गेल्यानं राजकारण तापलंय. त्यावरुनच शिवसेनेनं निशाणा साधलाय. महाराष्ट्राचे गुजरातशी भांडण असण्याचं कारण नाही. गुजरात पाकिस्तान नाही हे तुम्ही का सांगता? असा उलट सवाल शिवसेनेनं केलाय. इतकंच काय, तर सध्या राज्यातील वातावरण उद्योग व्यापारासठी निकोप नाही. राज्यातली मोठी गुंतवणूक खोके कंपनीत झाल्यामुळे वसुलीसाठी उद्योग आणि गुंतवणूकदारांची पळापळ सुरु असल्याचं सामना अग्रलेखात म्हटलंय. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाहीच, पण महाराष्ट्राला दुश्मन ठरवले जात आहे, अशा शब्दांत नव्या सरकारला शिवसेनेनं अग्रलेखातून सुनावलंय. पंतप्रधान आणि गुहमंत्री गुजरातचे म्हणून सर्व प्रकल्प, उद्योग गुजरातकडे वळवले जात आहेत, असा आरोप शिवसेनेनं केलाय.

 

Published on: Sep 22, 2022 08:16 AM