महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली काय?, राऊतांचा घणाघात

महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली काय?, राऊतांचा घणाघात

| Updated on: Jul 15, 2021 | 10:34 AM

गल्लीपासून दिल्लीपर्यंत नरडी बसेपर्यंत घोषणाबाजी करणाऱ्या, कॅमेऱ्यासमोर येऊन महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालिन आंदोलकांची आता दातखीळ बसली आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केलीय.

मुंबई : देशभरात महागाईचा आगडोंब उसळलाय. दररोज महागाई नवा स्तर गाठत आहे. इंधनाच्या दरवाढीने तर सर्वसामान्य माणसाचा जीव हैरान झाला आहे. याच विषयावर आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या कोट्यवधी गोरगरीब जनतेने कसे जगायचे, याचे उत्तर सरकारकडे आहे काय?, असा रोकडा सवाल विचारत, कधी काळी याच महागाईच्या प्रश्नावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत नरडी बसेपर्यंत घोषणाबाजी करणाऱ्या, कॅमेऱ्यासमोर येऊन महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालिन आंदोलकांची आता दातखीळ बसली आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केलीय.