Saamna | केंद्रीय जोर लावूनही महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार पडत नाही - सामना

Saamna | केंद्रीय जोर लावूनही महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार पडत नाही – सामना

| Updated on: Sep 21, 2021 | 8:49 AM

चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता, असा टोला आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ”ईडी’शी लढताना तोंडाला फेस येईल.” पाटील यांना ‘ईडी’चा इतका अनुभव कधीपासून आला?, कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता, असा टोला आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.