सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती? ‘त्या’ टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार

मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी नुकतंच मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले. यावरुन आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच सुषमा अंधारेंनी केलेल्या टीकेवर यामिनी जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे

सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती? 'त्या' टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
| Updated on: Sep 13, 2024 | 2:43 PM

लोकसभेत मुस्लिम समाजाने मतदान केलं नाही, असं म्हणत ओरड करणारी भाजपा आणि त्याच्यासोबत नव्या हिंदुत्वाने पछाडलेल्या शिंदे सेनेसोबत गेलेले लोकं कुही कुही सुरुवात केली होती की, हिरव्या मतांवर मविआ निवडून आली. आम्ही हिरव्या मतांचा विचार करणार नाही, मुस्लिमांचं लांगुलचालन करणार नाही म्हणाणारे आता आम्हाला शिंदेंना प्रश्न विचारायचा आहे, कुणाच्या लांगुलचालनासाठी बुरखा वाटप करतायत? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलाय. तर यामिनी जाधव बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतायत तो कुणाच्या लांगुलचालनासाठी? बुरखा वाटपाचा मोह होतो याचा अर्थ मुस्लिम मतावर डोळा ठेवून तुम्हाला हे सगळं थेरं सुचत आहेत का? असा खोचक सवालही अंधारे यांनी केला. यावर स्वतः यामिनी जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय. “गेल्या वर्षभरापासून ही संकल्पना माझ्या डोक्यात आहे. कारण मुस्लिम धर्मातील महिलांना सर्वात जास्त काय प्रिय असेल तर तो बुरखा. हा त्यांचा एक सन्मान आहे. त्या दृष्टीने मी हे वाटप केलेलं आहे. माझ्यावर टीका होत आहे की, लांगूनचालन आम्ही करत आहोत. पण गेल्या अनेक वर्षांपासून मी मुस्लिम धर्मासाठी काम करत आहे. कोरोना काळ सुरु असतानाही आम्ही मुस्लिम धर्मासाठी इफ्तारी पोहोचवली होती. त्यावेळी आमच्यावर टीका का झाली नाही. कारण त्यावेळी आम्ही तिकडे होतो म्हणून का?” असा सवालही यामिनी जाधव यांनी उपस्थित केला.

Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.