Special Report | पंतप्रधान मोदींवर शिवसेनेचे नवे तीक्ष्ण बाण !

| Updated on: Oct 20, 2021 | 12:44 AM

मनमोहन सिंग सरकारच्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत. ते आंदोलन करणारी मंडळी गेलीत कुठे?, असा सवाल सामनातून राऊतांनी विचारला आहे.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय. केंद्रीय सरकारला लागलेली अवाढव्य करांची चटक आणि तिजोरी भरण्याच्या हव्यासातच पेट्रोल-डिझेल दरवाढीचे मूळ दडले आहे. आता तर विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकींचे इंधन महाग झाले. मनमोहन सिंग सरकारच्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत. ते आंदोलन करणारी मंडळी गेलीत कुठे?, असा सवाल सामनातून राऊतांनी विचारला आहे.

Published on: Oct 19, 2021 09:24 PM