‘दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी…’, भास्कर जाधवांचा अजित पवारांना टोला
अजित पवारांना थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे गेले दोन दिवस ते नॉट रिचेबल होते अशी माहिती समोर येत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना सवाल केला असता ते म्हणाले, अजित पवार यांचा घसा चांगला व्हावा अशी आशा करतो. त्यांना खो-गो ची गोळी देणार आहे. त्यामुळे त्यांचा आवाज चांगला होईल. अधून-मधून त्यांचा आवाज बिघडतो तो होणार […]
अजित पवारांना थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे गेले दोन दिवस ते नॉट रिचेबल होते अशी माहिती समोर येत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना सवाल केला असता ते म्हणाले, अजित पवार यांचा घसा चांगला व्हावा अशी आशा करतो. त्यांना खो-गो ची गोळी देणार आहे. त्यामुळे त्यांचा आवाज चांगला होईल. अधून-मधून त्यांचा आवाज बिघडतो तो होणार नाही, असं म्हणत भास्कर जाधव यांनी अजितदादांना खोचक टोला लगावला. तर अद्याप खातेवाटप झालेले नाही. यावर बोलताना ते म्हणाले, या सरकारकडे पाशवी बहुमत आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर आम्ही कसेही वागणार, वाटेल तेव्हा खाते वाटप करणार, वाटेल तसं काम चालवू, वाटेल तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार करू नाहीतर करणारही नाही असं सरकार वागतंय. पाशवी बहुमताच्या जोरावर सरकारमध्ये अहंकार निर्माण झालेला दिसतोय. या सरकारमध्ये कोणाची कोणालाही गरज असल्याचं दिसत नाही, असे म्हणत भास्कर जाधव यांनी जोरदार हल्लाबोल केला. पुढे ते असेही म्हणाले, निवडणुकीपूर्वी या सरकारवर संपूर्ण महाराष्ट्र नारज होता. पण तरी सुद्धा या सरकारने EVM ची जादू करून हे लोक पुन्हा सत्तेत आले आहेत. आता सत्तेत आल्यानंतर ज्या सरकारवर हा महाराष्ट्र नाराज होता. त्या महाराष्ट्राच्या जतनेच्या मनाच्याविरोधात हा निर्णय झालाय. त्यामुळे कोणत्या पक्षाचे नेते नाराज आहेत किंवा नाही याचे सुख, दुःख वाटण्याचं कारण आम्हाला नाही, असा घणाघातही भास्कर जाधव यांनी केला.