“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार, म्हणाले, 'खोडा घालणाऱ्यांना जोडा...'

“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार, म्हणाले, ‘खोडा घालणाऱ्यांना जोडा…’

| Updated on: Nov 05, 2024 | 5:53 PM

कोल्हापुरातून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात केली. कोल्हापूरचे उमेदवार के. पी. पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी पहिली सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून प्रचाराची सुरुवात केली. कोल्हापूरचे उमेदवार के. पी. पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी पहिली सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी ख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह भाजपवर टीकास्त्र डागलं. उद्धव ठाकरे म्हणाले, एक भाऊ असेल तर ठीक पण आता तीन तीन भाऊ येत आहे. देवाभाऊ, जॅकेट भाऊ आणि दाढी भाऊ. तुमचा भाऊ कोणता? देवाभाऊ तुमचा? जॅकेट भाऊ तुमचा? की दाढी भाऊ तुमचा? असा खोचक सवाल करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय तर हे काही भाऊबिऊ नाही. हे सर्व जाऊ तिथे खाऊ असे भाऊ आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवलाय. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांनी देखील पलटवार केलाय. बघा काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Published on: Nov 05, 2024 05:53 PM