Disha Salian Case : सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, दिशाच्या पीएम रिपोर्टवर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया
Arwind Sawant : दिशा सालियान प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. दिशाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं समोर आलं आहे. त्यावर खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिशा सालियानचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून त्यातून दिशा सालियान हिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्य पराजित परेशान हो सकता है, पराजित नहीं’ असं यावर बोलताना सावंत यांनी म्हंटलं आहे. आमच्या तरुण मुलाला तुम्ही ज्या वेदना, त्रास तुम्ही देत आहेत. त्याचे घाव आमच्या हृदयावर सुद्धा होतं आहेत. अतिशय सच्चा आणि सज्जन असा तो मुलगा आहे. त्याच्यावर तुम्ही शंका घेत आहेत. तेही अशी लोकं ज्यांनी आमच्याच घरच मीठ खाऊन आमच्या घराचे वासे मोजत आहेत. याचंच दु:ख आम्हाला जास्त आहे. पण न्यायालय विलंब लागला तरी सत्याचा विजय होतो, असं अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटलं आहे.

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा

पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा

'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी

सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
