Sanjay Raut : ‘सौगात ए मोदी’चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
Sanjay Raut On Saugat e modi kit : रमजान महिन्यात मुस्लिमांना भाजप सरकारकडून 'सौगात ए मोदी' या किटचं वाटप केलं जाणार आहे. या निर्णयाचं खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे.
‘सौगात ए मोदी’ वाटपाच्या भाजपच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. जर सरकार अशी मदत करत असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. पण आपल्या राज्यातले सरकार मुस्लिमांच्या विरोधात जे विष ओकत आहे, त्यांना पंतप्रधान मोदींचा हा निर्णय स्वीकार आहे का?, असा खोचक प्रश्न उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. रमजान महिन्यात मुस्लिमांपर्यंत पोहोचता यावं यासाठी भाजप सरकार ३२ लाख मुस्लिमांना ‘सौगात ए मोदी’ किट वाटप करणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यावरून आज संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना महायुती सरकारवर निशाणा साधला.
पुढे राऊत म्हणाले की, 2029 ची लोकसभा निवडणूक आणि त्यापूर्वी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाज आपल्या सोबत आला नाही तर आपल्याला मतदान होणार नाही याची खात्री पटल्याने ते असे निर्णय घेत आहेत. यातून ते मुस्लिम राष्ट्रांना दाखवत आहे की, आमच्याकडील मुस्लिमांची आम्ही काळजी घेतो. हे दाखवण्याचा प्रयत्न करत स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका राऊतांनी केली. यावेळी कुणाल कामरा प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले की, कुणाल कामरा हा कलाकार धमक्यांना घाबरणारा नाही. तो मरेल पण घाबरणार नाही. राजकारणात या गोष्टी पहायच्या असतात आणि सोडून द्यायच्या असतात. अशा टीका जोवर खासगी नसतात तोपर्यंत त्या विनोद म्हणून बघून सोडून द्यायच्या असतात. आपण राजकारणात काम करतो, आपण टीकेचे घाव सोसले पाहिजे, असंही यावेळी राऊत यांनी म्हंटलं.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
