Sanjay Raut : विष्णुचा अवतार आहेत, तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं; राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका
Sanjay Raut Criticized PM Narendra Modi : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त त्यांना विष्णूचे अवतार म्हणतात. तसं असेल तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं. सगळे देश ट्रम्पच्या विरोधात उभे आहेत आणि इथे विष्णुचे अवतार गप्प आहेत, अशी खरमरीत टीका खासदार संजय राऊत यांनी आज भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफच्या धोरणावरून त्यांनी ही टीका केली आहे. हे लोक काहीही बोलतात. कोणाचीही तुलना कशाशीही करतात. आम्ही कधीही कोणाची तुलना केली नाही. आम्हाला तसा पोटसुळ उठत नाही. सत्तेत बसले आहेत म्हणून काहीही बोलत असतात, असं प्रत्युत्तर यावेळी संजय राऊत यांनी मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या टीकेवर दिलं आहे.
Published on: Apr 09, 2025 11:00 AM
Latest Videos

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत

‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'

'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली

पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
