Jalna News : कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
Thackeray Group Protest : जालन्यात माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. शेतकरी कर्जमाफी घेऊन लग्न, साखरपुडे करतात, असं वादग्रस्त विधान मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं.
जालन्यात माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध करण्यात आलेला आहे. यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील पदाधिकाऱ्यांनी केली.
शेतकरी कर्जमाफी घेऊन लग्न, साखरपुडे करतात, असं वादग्रस्त विधान मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत. एकीकडे कर्जमाफी मिळणार नसल्याने शेतकरी संतप्त असतानाच दुसरीकडे कोकाटे यांनी केलेल्या विधानामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आज जालन्यात कोकाटे यांच्या निषेधार्थ जोडे मरो आंदोलन करण्यात आलं.
Published on: Apr 07, 2025 04:38 PM
Latest Videos

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?

VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
