Sushma Andhare Video : कधीकाळी या बाई उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
‘तुमच्यासारखे 56 मी पायाला बांधून फिरते’ असं चित्रा वाघ अनिल परब यांना म्हणाल्या. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. आज सुषमा अंधारे यांनी देखील चित्रा वाघ यांच्यावर यावरूनच टीका केली आहे.
दिशा सालियन प्रकरणावरुन भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल सभागृहात विरोधकांवर ताशेरे ओढले. चित्रा वाघ अनिल परब यांना उद्देश म्हणाल्या, ‘तुमच्यासारखे 56 मी पायाला बांधून फिरते’. असं म्हणत असताना चित्रा वाघ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर विरोधकांकडून चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर बोलताना चांगलाच शाब्दिक हल्ला चढवला. ‘काल एका विचित्र बाईने किंचाळत सांगितलं उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांना क्लीनचिट दिली की नाही विचारा’, असं म्हणाल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितलं. पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘कधी काळी या बाई उद्धव ठाकरेंकडे पक्ष प्रवेशासाठी अगदी लोळत आल्या होत्या’, असं म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली. इतकंच नाहीतर ‘एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या. बाईंचा तसा तो नाद आहे, त्या तशाच वागत राहतात. त्यानंतर सोशल मिडियावर अनेकजण म्हणाले की झोपडपट्टीतील भाषा वापरली. पण झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो. झोपडपट्टीतील लोक गरीब असतात पण ते कधीच आपला इमान विकत नाहीत’, असं म्हणत खोचक चिमटा देखील चित्रा वाघ यांनी सुषमा आंधारेंनी काढला.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?

नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'

औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?

नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
