Sushma Andhare Video : ‘एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या, म्हणाल्या…’ , सुषमा आंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा
दिशा सालियन प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावेळी चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर सडकून टीका केली.
‘एक बाई विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या 56 जण पायाला बांधून फिरते’, असं म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनतील नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत असं म्हटलंय, ‘सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!’, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर खोचक निशाणा साधला. दिशा सालियन प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होतायंत. सभागृहात काल अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यात जुंपली. उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांना क्लीनचीट दिली आहे. ती माझ्या जातीची नाही, तरीही मी कायम लढत राहिले, असे चित्रा वाघ म्हणाल्या. यावेळी त्यांनी अनिल परबांवर जिव्हारी लागणारी टीका केली. “संजय राठोडला उध्दव ठाकरेंनी क्लीनचीट दिली. अनिल परब यांनी उध्दव ठाकरेंना विचारावं. चित्रा वाघ तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते. मी काय वशिल्याने आले नाही. उध्दव ठाकरेंनी क्लीनचीट दिली. जाता जाता बोलले हीच्या नवऱ्याला पकडलं. अनिल परबांनी सांगितलं की संजय राठोडांनी कसा लढा दिला. तुमच्या नेत्यांना मी विचारणार की संजय राठोडला कशी क्लिनचीट दिली”, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.
‘ओ अनिल परब, हिंमत आहे तुमच्यात…आम्हाला हलक्यात घेऊ नका’; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
