शिवसेना महापालिका निवडणूक मराठी भाषेच्या मुद्यावर लढवणार
मुंबई महापालिका निवडणुसाठी शिवसेनेकडून रणनिती ठरवण्याचं काम सुरु आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मराठीच्या मुद्याला प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुसाठी शिवसेनेकडून रणनिती ठरवण्याचं काम सुरु आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मराठीच्या मुद्याला प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. मुंबईतील मराठी मतदारांची संख्या 36 टक्के आहे. या मतदारांमध्ये 40 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे मतदार आहेत. हक्काचे मतदार सोडून जाऊ नयेत म्हणून शिवसेना पुन्हा एकदा मराठी भाषिकांचा मुद्दा निवडणुकीच्या निमित्तानं हातात घेण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे मुदत 7 मार्चला संपणार आहे.
Latest Videos