Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हातून नवजात बाळ पडलं अन्...

उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हातून नवजात बाळ पडलं अन्…

| Updated on: Oct 04, 2023 | 5:01 PM

VIDEO | नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल हॉस्पिटलमध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नवजात बालक उपचार करताना डॉक्टरच्या हातातून पडल्याने बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर नवजात बालकाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलाय.

नाशिक, ४ ऑक्टोबर २०२३ | नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. नवजात बालक उपचार करताना डॉक्टरच्या हातातून पडल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर नवजात बालकाच्या नातेवाईकांनी वसंत पवार मेडिकल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला आणि डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. इतकेच नाही तर हा प्रकार घडल्यानंतर नवजात बालकाचे नातेवाईक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नवजात बालकावर उपचार सुरू असताना डॉक्टरांकडून ही घडल्याचा आरोप नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी कडक कारवाई करावी आणि पुढे असे प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी या घडलेल्या प्रकारानंतर केली जात आहे. दरम्यान, वसंत पवार मेडिकल हॉस्पिटलमध्ये या घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर नवजात बालकाच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Published on: Oct 04, 2023 05:01 PM