नागपुरकरांनो सावधान! बस चालकाच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे तुमच्या जीवाला धोका
VIDEO | रॅश ड्रायव्हिंगमुळे नागपुरात अपघाताचा धोका! ‘ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट’चा हा धक्कादायक निष्कर्ष, सर्व्हेतून काय झाले उघड?
नागपूर : नागपूरातील सीटी बसचे ४० टक्के चालक रॅश ड्रायव्हिंग करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रॅश ड्रायव्हिंगमुळे सीटी बसेसपासून नागपूर शहरातील रस्त्यांवर अपघाताचा धोका असून, अपघाती मृत्यूचाही धोका असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभरापूर्वी नागपुरातील २०० सिटी बसेसमध्ये ‘ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट’ हे डिव्हाइस लावण्यात आले आहे. याद्वारे चालक कशी गाडी चालवतो, रॅश ड्रायव्हिंग करतो का, या डिव्हाइसचा अलर्ट आल्यावर काय करतो, त्याच्या ड्रायव्हिंगमध्ये सुधारणा आहे का? या बाबींचा अभ्यास करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वर्षभरात ४० टक्के चालकांमध्ये सुधारणा झाली नसून, नागपूर सीटी बसचे ४० टक्के चालक रॅश ड्रायव्हिंग करत आहेत, ‘ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट’चा हा धक्कादायक निष्कर्ष आहे. ६० टक्के चालक सुधारले असल्याचा निष्कर्ष आहे. अपघात आणि मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी ९० टक्के ड्रायव्हरमध्ये सुधारणा गरजेच्या आहेत, असं तज्ज्ञ सांगतात.