भारताचं ऐतिहासिक प्रवेशद्वार 'गेट वे ऑफ इंडिया'ला मोठा धोका, काय सांगतो अहवाल?

भारताचं ऐतिहासिक प्रवेशद्वार ‘गेट वे ऑफ इंडिया’ला मोठा धोका, काय सांगतो अहवाल?

| Updated on: Mar 09, 2023 | 4:44 PM

VIDEO | 'गेट वे ऑफ इंडिया'ला येत्या वर्षात १०० वर्षे पूर्ण, महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाच्या अहवालातून आली धक्कादायक माहिती समोर

मुंबई : मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. या इमारतीला येत्या वर्षात १०० वर्षे पूर्ण होत आहे. मात्र धक्कादायक म्हणजे गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तुला धोका निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र पुरातत्त्व विभागातर्फे इमारतीचं स्ट्रक्टरल ऑडिट करण्यात आलं. या ऑडिटच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली असून या वास्तुचा पाया आणि भिंती धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या वास्तुच्या पाया आणि भिंतींना आता तडे जात असल्याने संपूर्ण इमारत धोकादायक ठरू शकते. इमारतीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची गरज असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालात सांगण्यात आलंय. इतकेच नाही तर राज्याच्या पुरातत्व विभागाने महाराष्ट्र सरकारला गेट वे ऑफ इंडियाची दुरुस्ती करून घेण्याची शिफारस केली आहे.

Published on: Mar 09, 2023 04:44 PM