भीमेच्या पात्रातल्या एकाच घरातील ‘त्या’ 7 मृतदेहांचे गूढ उकलले; आरोपींची कबुली काय?
एकाच कुटुंबातील ७ जणांच्या मृतदेहाचे गूढ उकलले असून याप्रकऱणी करणीच्या संशयावरून हत्या केली असल्याची आरोपीनी दिली कबुली
पुण्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दौंड तालुक्यात भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृतदेह आढळून आला आहे. या ७ जणांच्या मृतदेहात तीन लहान बालकांचा देखील समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पारगावमधील भीमा नदीच्या पात्रात गेल्या ७ दिवसांत ७ मृतदेह सापडले आहेत. नदीत रोज एक मृतदेह सापडत होता. यामुळे हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. भीमा नदीच्या पात्रातील एकाच कुटुंबातील ७ जणांच्या मृतदेहाचे गूढ उकलले असून याप्रकऱणी करणीच्या संशयावरून हत्या केली असल्याची आरोपीनी कबुली दिली आहे. इतकेच नाही तर पोलिसांनी चार आरोपींना अटकही केली आहे. हा अपघात सदर कुटुंबियांनी अंधश्रद्धा आणि करणीच्या माध्यमातून केल्याचा आरोप केला आहे. त्याच रागातून संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.