VIDEO : एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या विनोद कांबळींची अशी अवस्था पाहून तुम्हीही व्हाल थक्क, चालताही येईना...

VIDEO : एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या विनोद कांबळींची अशी अवस्था पाहून तुम्हीही व्हाल थक्क, चालताही येईना…

| Updated on: Aug 06, 2024 | 12:07 PM

Vinod Kambli Viral Video : सचिन तेंडुलकर यांचा जीवलग मित्र आणि एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी यांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. एकेकाळी स्टार असणाऱ्या विनोद कांबळींना चालताही येत नसल्याचे पाहायला मिळतंय.

सध्या सोशल मीडियावर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जीवलग मित्र आणि एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी यांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. एकेकाळी स्टार असणाऱ्या विनोद कांबळींना चालताही येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क होऊन तुम्हालाही धक्का बसेल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असे दिसते की, विनोद कांबळी यांना नीट उभं देखील राहता येत नाहीये. यावेळी उभं राहण्यासाठी त्यांना त्यांच्या जवळ असेलेल्या बाईकचा आधार घ्यावा लागतोय. जेव्हा ते चालायचा प्रयत्न करतात, त्यावेळी आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्यांना आधार दिला असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, विनोद कांबळींना नेमकं काय झालं? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

Published on: Aug 06, 2024 12:07 PM