Nana Patole | चीनची चमचेगिरी करणाऱ्यांनी राहुल गांधींच्या टी शर्टवर बोलू नये, नाना पटोले यांची टीका
Nana Patole | चीनची चमचेगिरी करणाऱ्यांनी राहुल गांधींच्या टी शर्टवर बोलू नये अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
Nana Patole | चीनची (chiana) चमचेगिरी करणाऱ्यांनी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) टी शर्टवर बोलू नये अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. चीनने अरुणाचल प्रदेशाच्या काही भागावर अतिक्रमण केले. त्यावेळी केंद्रातील सरकार मूग गिळून बसल्याचा आरोप त्यांनी केला. देशाचे पंतप्रधान, संरक्षणमंत्री चीनच्या अतिक्रमणाविरोधात एक शब्दही विरोधात बोलले नाही. राहुल गांधी यांनी चीनच्या या भूमिकेला जाहीरपणे विरोध केल्याचे त्यांनी सांगितले. आता चीनने सैन्य माघार घेतल्याच्या बातम्या येत आहे. याचा अर्थ चीनचे सैन्य देशाच्या सीमांवर येऊन धडकले होते. पण त्याविरोधात कोणीच काही बोलले नसल्याचा दावा त्यांनी केला.
विकासाच्या आड काँग्रेस येणार नाही
या देशात सुई तयार होत नव्हती, तेव्हापासून ते रॉकेट, सॅटेलाईट तयार करेपर्यंतच्या विकासाच्या प्रवासात काँग्रेसने या देशाला मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे काँग्रेस विकासाच्या आड येणार नाही. चिपळून येथील रिफायनरीच्या वादाविषयी ते बोलत होते.