नादखुळा ! खिळे अन् धाग्यापासून साकारली शिवरायांची प्रतिकृती, बघा व्हिडीओ
VIDEO | ७ दिवसांत ३०० खिळे आणि ४ हजार धाग्यांच्या साहाय्याने २ बाय २ वर्तुळात छत्रपती शिवाजी महाराजांची साकारली प्रतिकृती, बघा व्हिडीओ
ठाणे : डोंबिवलीतील एका तरुणीने कलेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला आहे. तिने चक्क खिळे आणि धाग्याचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांची अनोखी प्रतिकृती बनवत आपली कलाकृती सादर केली आहे. श्रद्धा पाटील असे या तरूनीच नाव असून श्रद्धा ही शिवप्रेमी असून लहानपणापासून ती अनोख्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारत असते. यंदा तिने चक्क खिळे आणि धाग्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली आहे. यासाठी तिला ७ दिवसांचा कालावधी लागला असून कोणाचीही मदत न घेता तिने ३०० खिळे आणि ४ हजार धाग्यांच्या साहाय्याने २ बाय २ वर्तुळात महाराजांची प्रतिकृती साकारली आहे. बघा या अवलिया कलाकाराची अप्रतिम कलाकुसर
Published on: Apr 02, 2023 08:11 PM
Latest Videos