श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा आदित्य ठाकरे यांना डिवचलं, म्हणाले, ठाकरे नाईट लाईफ बाहेरुन शिकून आले असतील!

श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा आदित्य ठाकरे यांना डिवचलं, म्हणाले, “ठाकरे नाईट लाईफ बाहेरुन शिकून आले असतील!”

| Updated on: Jun 07, 2023 | 8:17 AM

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे चांगलेच सक्रिय झाले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना शाखा संपर्क अभियान सुरू केले असून, ते मुंबईतील विविध शाखांना भेट देत आहेत. यानिमित्त ते तळागळातील शिवसैनिकांशी चर्चा करत आहेत. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी 'सामना'च्या दारातील शाखेला भेट देत थेट उद्धव यांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे चांगलेच सक्रिय झाले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना शाखा संपर्क अभियान सुरू केले असून, ते मुंबईतील विविध शाखांना भेट देत आहेत. यानिमित्त ते तळागळातील शिवसैनिकांशी चर्चा करत आहेत. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी ‘सामना’च्या दारातील शाखेला भेट देत थेट उद्धव यांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. तसेच श्रीकांत शिंदेंबद्दलचा प्रश्न विचारल्यावर थुंकल्याची प्रतिक्रिया दिलेल्या संजय राऊत यांनाही प्रत्युत्तर देण्याचा हा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका ही केली आहे. “आदित्य ठाकरे नाईट लाईफ बाहेरून शिकून आले असतील”, असा निशाणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी साधला. तसेच “काही लोकांनी थुंकण्याचा नवा धंदा सुरु केलाय”, अशी टीकाही श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

Published on: Jun 07, 2023 08:17 AM