'आज त्यांची नावं न घेणं योग्य', अप्रत्यक्षपणे टोला लगावत श्रीकांत शिंदे यांची खोचक प्रतिक्रिया

‘आज त्यांची नावं न घेणं योग्य’, अप्रत्यक्षपणे टोला लगावत श्रीकांत शिंदे यांची खोचक प्रतिक्रिया

| Updated on: Apr 16, 2023 | 10:57 AM

VIDEO | महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळास्थळावरून शिवसेनेच्या नेत्याची महाविकास आघाडीच्या नागपुरातील सभेसंदर्भातील प्रश्नावर प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो श्री सदस्य शनिवारपासून नवी मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना लाखो श्री सदस्यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रत्येक श्री सदस्यांसह आमच्याही जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत. एकीकडे आज खारघरमध्ये डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा पुरस्कार सोहळा होतोय तर दुसरीकडे नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होतेय. यावरून त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आजच्या या कार्यक्रमाला अशा लोकांची नाव घेतली नाही पाहिजे. आज चांगली दिशा मिळणार असून अध्यात्मिक विषयावर बोलल्यास त्याचा समाजाला फायदा आहे. रोज तेच तेच सकाळीदाखवून जनतेची सकाळी खराब होते, त्यामुळे आज हा कार्यक्रम दाखवा, असे म्हणत संजय राऊत यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांनी टोला लगावला आहे.

Published on: Apr 16, 2023 10:46 AM