ईडीने समन्स बजावल्याबद्दल संजय राऊतांना शुभेच्छा- श्रीकांत शिंदे
शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्या आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबतचा तिढा कायम आहे.
“कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागणार. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. राज्यात भविष्यात चांगलं सरकार येईल आणि ते सरकार लोकांच्या मर्जीचं सरकार असेल. पायाखालची वाळू सरकल्याने संजय राऊत अशी विधानं करत आहेत. ईडीने त्यांना समन्स बजावल्याबद्दल राऊतांना शुभेच्छा,” अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्या आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबतचा तिढा कायम आहे. 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
Published on: Jun 27, 2022 01:42 PM
Latest Videos