Shrikant Shinde | केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्त्तर
पाटील यांच्या या टीकेवर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे. ते कोणत्या रस्त्याबद्दल बोलत आहेत हे मला माहीत नाही. माझ्या मतदारसंघातील कल्याण-शीळ रस्त्याचे काम सुरू आहे.
कल्याण : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमधील रस्त्यांच्या कामावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. पाटील यांच्या या टीकेवर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे. ते कोणत्या रस्त्याबद्दल बोलत आहेत हे मला माहीत नाही. माझ्या मतदारसंघातील कल्याण-शीळ रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामांसाठी 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अंबरनाथ, उल्हासगनगरातही विकासकामे सुरू आहेत, असं सांगतानाच ते त्यांच्या मतदारसंघाविषयी तर बोलत नाहीत ना?; असा टोला श्रीकांत शिंदे यांनी पाटील यांना लगावला.
Latest Videos