रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? संभाजी राजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटेंनी स्पष्ट म्हटलं…
वाघ्या कुत्रा हा कोणत्याही समकालीन संदर्भात नाही. मात्र संभाजीराजे एकदा विषय घेतला की तडीस नेतात, असं इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी म्हटलं आहे.
किल्ले रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी माजी खासदार संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणताही उल्लेख नसून या कुत्र्याची समाधी म्हणजे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असल्याचं म्हटलंय. इतकंच नाहीतर ३१ मेपर्यंत ही समाधी हटवावी, असंही संभाजी राजेंनी म्हटलंय. दरम्यान, या संदर्भात इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘संभाजी राजे यांनी केलेली मागणी ही योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रात रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याची समाधी होती याला पुरावा नाही. राम गणेश गडकरींच्या डोक्यातून आलेली ही विकृत कल्पना आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या समाध्या आहेत, त्याचा हा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अपमान आहे. त्यामुळे हा पुतळा हटवण्यात यावा’, असं म्हणत संभाजी राजेंनी केलेली मागणी योग्य असल्याचे श्रीमंत कोकाटे यांनी म्हटलंय.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...

'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप

वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
