अन् मोठा मोर्चा काढणार; शुभांगी पाटील यांचाकडून विजयाचा दावा

अन् मोठा मोर्चा काढणार; शुभांगी पाटील यांचाकडून विजयाचा दावा

| Updated on: Jan 29, 2023 | 2:12 PM

जनशक्ती पेटली आहे आणि तिचा आणि माझा अंत होऊ देऊ नका, शुभांगी पाटील यांनी जनतेला केलं आवाहन

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. त्याआधी या निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्याकडून वेळोवेळी दावा केला गेला की, निवडणूक एकतर्फी होणार आणि आमचाच विजय होणार.. मात्र अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी विजयाचा दावा केला आहे. जनशक्ती पेटली आहे आणि तिचा आणि माझा अंत होऊ देऊ नका. जनता सर्वकाही असते. कोणाच्याही खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. तुमच्या मदतीने २ फेब्रुवारीला विजयी झाल्यावर मोठं आंदोलन होईल. पदवीधरांच्या अनेक प्रश्नांसाठी, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी, पदभरतीसाठी, सुशिक्षित बेरोजगासाठी मोठं आंदोलन करेल मगच मी विजय साजरा करेल, असा शब्दही त्यांनी दिला.

Published on: Jan 29, 2023 02:12 PM