सिद्धारमय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

सिद्धारमय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

| Updated on: May 20, 2023 | 3:31 PM

VIDEO | कर्नाटकाची धुरा आता सिद्धारमय्या यांच्या हाती, मुख्यमंत्री म्हणून घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ

बंगळुरू : कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धारमय्या यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. सिद्धारमय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. बंगळुरू येथील कांटेरावा स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अभिनेते कमल हसन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदी उपस्थित होते.

Published on: May 20, 2023 03:31 PM