उद्धव ठाकरे यांचा ‘तो’ मनसुबा हाणून पाडणार, भाजप नेत्यानं तारीख सांगत दिला इशारा
VIDEO | येत्या ६ तारखेला भेटूया म्हणत भाजप नेत्यानं ट्विट करत उद्धव ठाकरे यांना बारसू रिफायनरी संदर्भात दिला इशारा
मुंबई : उद्धव ठाकरे ६ मे ला बारसूत येणार आहेत. त्या दिवशी मोठं काहीतरी घडवण्याचे षडयंत्र होत असल्याचा दावा भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, काल निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा मोठा दावा केला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बारसूत मोठी तयारी सुरु आहे. बारसूत षडयंत्र रचलं जातंय. जिलेटिनच्या काड्या गोळा केल्या जात आहेत. विषय खूप गंभीर आहे, असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले होते. तर आज निलेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. ६ तारखेला आम्ही रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार त्या तयारीसाठी आज ४ वाजता आम्ही रत्नागिरीत पोहोचतोय, असे निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे. तर कोकणाला विस्कटलेलाच ठेवायचा हा उद्धव ठाकरे यांचा मनसुबा आहे. आम्ही तो मनसुबा येत्या ६ तारखेला हाणून पाडणार, असा इशारा निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यासह तुम्ही संपूर्ण ताकद लावा, भेटूया ६ तारखेला असेदेखील ट्विटमध्ये म्हटले आहे.