एका बॅनरमुळे महाविकास आघाडीत होणार बिघाडी? बॅनरवर नक्की लिहिलंय तरी काय?
VIDEO | नाशिक लोकसभा जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये होणार बिघाडी? कारण नेमकं काय? 'त्या' बॅनरची होतेय चर्चा
नाशिक : आज नागपुरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे आणि त्यातच दुसरीकडे नाशिकमध्ये लागलेल्या एका बॅनरमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असल्याचे समोर येत आहे. याचं कारण म्हणजे सिन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतीनी कोकाटे यांचं लागलेले बॅनर. या बॅनरवर नक्की आशय असा कोणता आशय आहे, ज्यामुळे काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्येची जोरदार चर्चा सुरू आहे. या बॅनरवर नाशिक लोकसभेच्या पहिल्या महिला भावी खासदार सिमंतीनी माणिकराव कोकाटे औक्षवंत व्हा… असा आशय लिहिला आहे. भाजप सेनेची युती होती तेव्हापासून नाशिक लोकसभा जागा ही पारंपारिकरित्या शिवसेनेकडे म्हणजे आताच्या ठाकरे गटाकडे जाणार हे निश्चित असताना राष्ट्रवादीच्या नेत्याकडून असं बॅनर लावणं हे चर्चेचा विषय ठरतोय.
Published on: Apr 16, 2023 03:10 PM
Latest Videos