Santosh Deshmukh Case : ‘SIT मध्ये असलेला अधिकारी वाल्मिक कराडच्या जवळचा…’, बजरंग सोनावणेंचा आणखी एक दावा
महेश विघ्ने नावाच्या व्यक्तीचा वाल्मिक कराड सोबतचा फोटो दाखवत बजरंग सोनावणे यांनी हा मोठा आरोप केला आहे. इतकंच नाहीतर 'मित्रच वाल्मिक कराड याची चौकशी कशी करेल?', असा सवालही बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे.
SIT मध्ये असलेला अधिकारी वाल्मिक कराडच्या जवळचा असल्याचा मोठा दावा शरद पवार गट यांच्या राष्ट्रवादीतील खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. महेश विघ्ने नावाच्या व्यक्तीचा वाल्मिक कराड सोबतचा फोटो दाखवत बजरंग सोनावणे यांनी हा मोठा आरोप केला आहे. इतकंच नाहीतर ‘मित्रच वाल्मिक कराड याची चौकशी कशी करेल?’, असा सवालही बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे. ‘ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशीचा काढलेला वाल्मिक कराडचा एक फोटो जयंतराव पाटील यांनी ट्वीट केला. या फोटोमध्ये जो एक व्यक्ती आहे, तो आता एसआयटीमध्ये घेतलेला अधिकारी आहे. त्याचा आरोपी सोबत फोटो दिसतोय. हा अधिकारी जर इतका आनंदोत्सव साजरा करत असेल तर हा अधिकारी आरोपीचा मित्र असेल तर तो आरोपीची किती चौकशी करेल?’, असं बजरंग सोनावणे म्हणाले. पुढे त्यांनी असेही म्हणाले बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही लढतच राहणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.