शीतल म्हात्रे प्रकरण आता SIT कडे, मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत काय दिली माहिती?
VIDEO | अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवेदन देण्याच्या आदेशानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत काय म्हटले, बघा व्हिडीओ
मुंबई : शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आला. यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच आज आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या तथाकथित व्हिडीओ घटनेसंदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज संपेपर्यत सभागृहात निवेदन देण्याचे आदेश सरकारला दिले होते. या आदेशानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच याप्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. व्हायरल व्हिडीओबाबत शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. त्यानंतर दहिसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मराठे तपास करत आहेत. यामध्ये अशोक राजदेव मिश्रा (45), अनंत कुवर (30), विनायक भगवान डावरे (26) आणि रवींद्र बबन चौधरी (34) असा चार आरोपीना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.