महाविद्यालयाची वेबसाईट हॅक, पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याचा प्रकार, कुठं घडली घटना?

महाविद्यालयाची वेबसाईट हॅक, पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याचा प्रकार, कुठं घडली घटना?

| Updated on: Jun 17, 2023 | 6:54 AM

VIDEO | एकच खळबळ, वेबसाईटवर नोटीस विभागात पाकिस्तान जिंदाबादचे नारे प्रकाशित, नेमकं काय घडलं ?

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात असलेल्या मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवरून पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आलेले आहेत. मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या वेबसाईटवर नोटीस बोर्ड या टॅब खाली पाकिस्तान जिंदाबादचे नारे प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. महाविद्यालयाच्या वेबसाईटवर अशा पद्धतीने पाकिस्तान जिंदाबादचे नारे प्रसिद्ध कसे काय झाले ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस यंत्रणेनेही या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतल आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी मेहकर ठाणेदार परदेशी यांना तात्काळ संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देऊन दोशींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलं ? याचा तपास आता मेहकर पोलीस करताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत महाविद्यालयाकडून कुठल्याच प्रकारची पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही, त्यामुळे पोलीस तपासात आता काय तथ्य समोर येतात ते पाहावं लागणार आहे.

Published on: Jun 17, 2023 06:45 AM