हंडा मोर्चा; गुलाबराव पाटील यांच्याविरोधात गुलाबराव पाटील यांनीच दिल्या घोषणा? काय प्रकार आहे हा?
याचदरम्यान जळगावातही पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याही विरोधात रोष पहायला मिळत आहे. पाणीपुरवठामंत्री जिल्ह्यातच असून प्यायला लोकांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी हंडा मोर्चा काढला.
जळगाव : राज्यातील अनेक भागात उष्णतेचा कहर वाढत आहे. पाण्यासाठी लोकांना टँकरसह राणावणातील पाणवट्यांवर अवलंबून रहावं लागतं आहे. तर पाण्याच्या या तिव्र टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांच्याकडून आंदोलने केली जात आहे. याचदरम्यान जळगावातही पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याही विरोधात रोष पहायला मिळत आहे. पाणीपुरवठामंत्री जिल्ह्यातच असून प्यायला लोकांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी हंडा मोर्चा काढला. तोही गुलाबराव पाटील यांचा आज वाढदिवस असतानाच. मन्यारखेडा इथल्या घरकुल रहिवाशांनी संपत्प होत हा मोर्चा काढला. ज्यात महिला, लहान मुले, मुली यांचा समावेश होता. तर देण्यात येणाऱ्या घोषणात प्रति गुलाबराव पाटील असल्याने अनेकांना हा धक्काच बसला. या मोर्चात एकाने मंत्री गुलाबराव पाटलांचा मुखवटा घालून घोषणाबाजी दिल्या. त्यामुळे याची चर्चा जळगावात रंगली आहे. तर 12 वर्षे घरकुलमध्ये राहूनही पाणी, वीज रस्ते नाहीत असा अरोप नागरिकांनी केला आहे.

या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार

27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात

मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा

पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
