Vasant Khalatkar | लहान मुलं सुपरस्प्रेडर,कोरोना लाटेत काळजी घ्या, बालरोगतज्ज्ञांचा पालकांना सल्ला
लहान मुलांना गृह विलीगीकरणात ठेवणं गरजेचं असून, मुलांचं नियमित ॲाक्सिजन सॅच्युरेशन तपासून, 93 पेक्षा कमी ॲाक्सीजन सॅच्युरेशन असल्यास मुलांना त्वरीत दवाखाण्यात दाखल करा” असा सल्ला प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॅा. वसंत खळतकर यांनी दिलाय.
नागपुरात : कोरोनाची वाढती आकडेवारी धडकी भरवणारी आहे. सध्या नागपुरात 2600 च्या वर सक्रिय रुग्ण असून यात मुलांचंही प्रमाण आहे. “मुलांना फारशी लक्षणं नसली तरिही मुलं कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरु शकतात. त्यामुळे लहान मुलांना गृह विलीगीकरणात ठेवणं गरजेचं असून, मुलांचं नियमित ॲाक्सिजन सॅच्युरेशन तपासून, 93 पेक्षा कमी ॲाक्सीजन सॅच्युरेशन असल्यास मुलांना त्वरीत दवाखाण्यात दाखल करा” असा सल्ला प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॅा. वसंत खळतकर यांनी दिलाय. ओमिक्रॅानचा संसर्ग लहान मुलांना होत असला तरी आतापर्यंत मुलांमध्ये फारसे गंभीर परिणाम होत नाही, असंही त्यांनी सांगीतलं.
Latest Videos