छोट्या पुढारीनं गौतमी पाटील हिला पुन्हा डिवचलं, म्हणाला, ‘… तुम्ही मार खाऊ शकतात’
VIDEO | 'तुम्ही तरुण पिढी बरबाद करताय', छोटा पुढारी घनश्याम दरोडेचा पुन्हा गौतमी पाटीलला इशारा
अहमदनगर : गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंय. गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होतेच होते. बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते म्हणून कुणी झाडावर जाऊन बसतो तर कुणी घराच्या छतावर जाऊन गौतमीच्या दिलखेचक अदा न्याहाळताना दिसतो. गौतमीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी असते की पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो. “गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये”, असा इशारा छोटा पुढारी घनश्याम दराडे याने गौतमी पाटीलला दिला होता. यानंतर आता पुन्हा या छोटा पुढारी घनश्याम दराडे याने गौतमी पाटीलला डिवचल्याचं पाहायला मिळत आहे. तो म्हणाला, महाराष्ट्राचा बिहार करू नका. वाटलं तर बिहारमध्ये जाऊन राडा आणि गोंधळ घाला. आतापर्यंत गौतमी पाटील हिचा डान्स बघायला तरूणाई स्टेजच्या खाली गोंधळ घालताना दिसत होती. हे जर थांबलं नाही तर ही तरुण पोरं स्टेजवर येऊन दंगल करतील त्यात तुम्ही मार खाऊ शकतात, असे म्हणत पुन्हा इशारा दिलाय. तुम्ही तरुण पिढी बरबाद करताय, त्यांना योग्य दिशा द्यायची सोडून त्यांना बरबाद करत आहेत, असे म्हणत निशाणाही साधला.